सुरूते विद्यामंदिरला पाणी बाटल्यांसाठी 25 हजार रुपयांची देणगी - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2024

सुरूते विद्यामंदिरला पाणी बाटल्यांसाठी 25 हजार रुपयांची देणगी

सुरूते : विद्यार्थ्यांना पाण्याच्या स्टील बाटल्यांचे वितरण करताना नारायण पाटील, मारुती पाटील, भरमु आपटेकर आदी.
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       सुरूते (ता. चंदगड) येथे प्लास्टिक मुक्त शाळा या उपक्रमासाठी गावातील कुमार विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या स्टील बाटली साठी सुरूते गावचे सुपुत्र व बेळगाव येथील अडत व्यापारी, मराठा बँकेचे संचालक बाळाराम पाटील यांच्याकडून 25 हजार रुपयांची देणगी देण्यात आली. या देणगीतून सर्व विद्यार्थ्यांना स्टील  बाटल्यांचे वितरण माजी सरपंच नारायण पाटील, सरपंच मारुती पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले.

      यावेळी सातू भाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरमू आपटेकर, उपाध्यक्ष अवधूत भुजबळ,  मुख्याध्यापक नामदेव चौगुले यांच्यासह गजानन भाटे, परसराम भाटे, रवळू येळूरकर, भरत भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment