छत्रपती शिवाजी महाराजांचे वाणिज्य धोरण सर्वांना दिशादर्शक - डॉ. मधुकर जाधव - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2024

छत्रपती शिवाजी महाराजांचे वाणिज्य धोरण सर्वांना दिशादर्शक - डॉ. मधुकर जाधव

हलकर्णी महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचे वाणिज्य व्यवस्थापन यावर व्याख्यान

चंदगड / प्रतिनिधी 

      बचतीचे धोरण आणि काटकसरीचे नियोजन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाणिज्य धोरणाचे तत्व होते. स्वराज्याचा स्वतंत्र अर्थमंत्री होता. अर्थसंकल्पनाच्या माध्यमातून वाणिज्य धोरण निश्चित केले जात असे. यातून रयतेच्या हिताचे धोरण राबवून सर्वसामान्यांच्या हिताची काळजी घेतली. मस्कत , एडन या देशांबरोबर व्यापारी संबंध जोडून स्वराज्याचा आर्थिक विकास साधला. स्वराज्यातून जाणाऱ्या पैसापेक्षा येणारा पैसा जास्त होता. स्वराज्यात खजिना महालातून पैशाचे व्यवस्थापन केले जात असे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे वाणिज्य धोरण सर्वांना दिशादर्शकच असे आहे.'असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मधुकर जाधव यांनी केले. येथील दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वाणिज्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचे वाणिज्य व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक प्रा.  जी. पी. कांबळे यांनी केले. सर्वांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. 

         या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील बी. कॉम भाग एक, दोन व तीन या वर्गाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रा. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. एम. एन. पाटील, प्रा. व्ही. डी. पाटील आदी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राजक्ता सुतार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment