कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तेऊरवाडीच्या शुभम पाटीलला ब्रॉन्झ पदक - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2024

कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तेऊरवाडीच्या शुभम पाटीलला ब्रॉन्झ पदक

 

पै. शुभम पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा 
     पुणे येथे चालू असलेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील कु. शुभम जनार्दन पाटील याने 80 किलो वजनी गटात उज्वल यश संपादन केले.
     महाराष्ट्रातील अनेक मल्लांना चितपट करत ब्रॉन्झ पदकावर नाव कोरले.
 तेऊरवाडीसारख्या ग्रामिण भागातून पै. लक्ष्मण भिंगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या शुभमने थेट महाराष्ट्र कुमार केसरी स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. यापूर्वी शुभमने जिल्हा विभाग व राज्य स्तरीय स्पर्धेत उज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या यशा बद्दल शुभमचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment