मनोहर जोशींच्या रूपाने एक संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड - प्रा. आर. पी. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2024

मनोहर जोशींच्या रूपाने एक संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड - प्रा. आर. पी. पाटील

                           

कै. मनोहर जोशी
                                           

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        "ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री कै. मनोहर जोशी यांचे निधन म्हणजे एका संयमी  नेतृत्वाची अखेर आहे. मनोहर जोशी हे अभ्यासू नेते होते. तसेच नैतिक मूल्यांची बांधिलकी मानणारे व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे व्यक्तिमत्व होते. एक सुसंस्कृत राजकारणीअशी त्यांची जनमानसात आदरयुक्त प्रतिमा होती. त्यांच्या जाण्याने राजकारणातल्या एका पर्वाची अखेर झाली असे म्हणायला हरकत नाही." असे प्रतिपादन प्रा. आर. पी. पाटील यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील कै. मनोहर जोशींच्या शोकसभेत बोलत होते.

      यावेळी प्र. प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी "कै. मनोहर जोशी यांनी ग्रामीण भागात उच्चव तंत्र शिक्षणाचा प्रसार करण्यास भरीव योगदान दिले. कोहिनूर टेक्निकलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून तंत्र शिक्षणाचा प्रसार केला. त्यांचे हे विधायक कार्य नेहमीच जनतेच्या स्मरणात राहील." अशी भावना व्यक्त केली. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांनी कै. मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

No comments:

Post a Comment