आपली स्पर्धा अन्य कोणाशी नसून स्वतः शीच - डॉ. मधुकर जाधव, माडखोलकर महाविद्यालयात 'करिअरच्या संधी 'या विषयावर व्याख्यान - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2024

आपली स्पर्धा अन्य कोणाशी नसून स्वतः शीच - डॉ. मधुकर जाधव, माडखोलकर महाविद्यालयात 'करिअरच्या संधी 'या विषयावर व्याख्यान

                                         

डॉ .मधुकर जाधव बोलताना. व्यासपीठावर डॉ.टी.एम. पाटील व प्र. प्राचार्य डॉ. एम. एम. माने.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          "आपली स्पर्धा अन्य कोणाशी नसून स्वतः शीच असते. रांगेत जाऊन उभे राहण्यापेक्षा स्वतःपासून रांग सुरू करता आली पाहिजे. ठरवल्याशिवाय काही होत नाही आणि यशाला शॉर्टकट नसतो. त्यामुळे पूर्ण क्षमतेने झोकून देऊन परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते. यशासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा योग्य प्रकारे शोध घेण्यात विद्यार्थी कमी पडतात. निश्चित जीवन ध्येय ठेवले आणि चिकाटीने अभ्यास केला तर यशाचे शिखर गाठता येणे सहज शक्य आहे." असे प्रतिपादन डॉ. मधुकर जाधव यांनी केले ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील इतिहास विभागाने आयोजित केलेल्या 'करिअरच्या संधी 'या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

         अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एम. एम. माने अध्यक्ष यांनी "विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच आपल्या जीवनाचा उद्देश जाणून घेतला पाहिजे. ज्ञान हीच आजच्या युगाची ताकद आहे हे लक्षात ठेवले पाहिजे." असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. आर. ए. कमलाकर, डॉ. एन. एस. मासाळ, एस. बी. दिवेकर, एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. एस. एन. पाटील, एस. डी. गोरल यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ए. डी. कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार डॉ. टी. एम. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment