संकटांना संधी समजल्यास यश हमखास मिळते : संजय साबळे, दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2024

संकटांना संधी समजल्यास यश हमखास मिळते : संजय साबळे, दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

 

संजय साबळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      "या जगात यशाला कोणताही शॉर्टकट नाही. कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणतेच यश मिळत नाही. आपल्यातील कौशल्य, क्षमता सिद्ध करायचे असल्यास संकटांना सामोरे जावंच लागेल. आपल्यात आत्मविश्वास निर्माण होणे म्हणजेच यश मिळवणे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेत. या जगात तीच माणसे यशस्वी होतात ज्यांनी नियोजनपूर्वक काम केला आहे. कोणतीही गोष्ट यशस्वी करायचे असेल तर त्यासाठी भान ठेवून नियोजन करून बेभान होऊन ते अमलात आणणे म्हणजेच यश होय  "असे प्रतिपादन संजय साबळे यांनी केले आहे. ते श्री कलमेश्वर विद्यालय सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. एम. शिंदे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एन. पाडले यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय सौ. व्ही. एम. सुतार यांनी करून दिला.

      "जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर आपल्याला यशाला गवसणी घालता येते यासाठी मनाची तयारी असावी लागते. " असे मत मुख्याद्यापक एम. एम. शिदे यांनी मांडले.

यावेळी  एस. डी. देसाई, वैष्णवी पाटील, पूर्वा पाटील, आरती जाधव, संपदा जाधव, अंजली सिताफ , मयुरी शिंदे, चंदना पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला एस. बी. सावंत, एस. बी. पवार, सौ. आर. आर. गावडे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुप्रिया बसाण व पूर्वा पोतदार तर आभार सौ. जे. आर. देसाई यांनी केले.

No comments:

Post a Comment