विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे - पी. के. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2024

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे - पी. के. पाटील

विविध स्पर्धात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
     आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना  विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. पण या परीक्षांना सामोरे जाताना मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास असेल तर जीवनात यशस्वी होता येत, असे विचार श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूरचे अध्यापक पी. के. पाटील यानी व्यक्त केले.
 श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी बुझवडे (ता. चंदगड) येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात पी. के. पाटील प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. के. हरेर होते.
       प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर वर्षभरात विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तसेच वर्गशिक्षक टि. बी. गावडे, ए. ए. अंबी यानी १० वी परिक्षार्थीना शुभेच्छा दिल्या. तर मुख्याध्यापक एस. के. हरेर यांनी मन मेंदू आणि मनगटाच्या जोरावर परीक्षेत उज्वल यश संपादन करण्याचे आवाहन केले. १० वीच्या परिक्षार्थिंनीही उज्वल यश संपादन करण्याची ग्वाही दिली.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक टी. एल. गावडे यांनी केले. सूत्रसंचालन कु. विजया डोंगरे हिने तर आभार ए. ए. अंबी यांनी मानले.

No comments:

Post a Comment