अथर्व - दौलत मधील जखमी कामगारांचा मृत्यू, संतप्त कामगार व ग्रामस्थांचा ठिय्या - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2024

अथर्व - दौलत मधील जखमी कामगारांचा मृत्यू, संतप्त कामगार व ग्रामस्थांचा ठिय्या

 


चंदगड / प्रतिनिधी

     हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व- दौलत साखर कारखान्यातील जखमी कामगारांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुंडू रामु पाटील (वय वर्ष ५१ रा.ढेकोळीवाडी ता.चंदगड)पंधरा दिवसांपूर्वी ड्रेन व्हाॅल्व उघडताना तोल जाऊन उंचावरून पडून हा कामगार गंभीर जखमी झाला होता. 

     मयत गुंडू पाटील हा १७ फेब्रुवारी रोजी कामावर असताना ड्रेन व्हाॅल्व उघडताना १२ फूट उंचावरून खाली पडला होता.‌ त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. 

     कारखान्याकडून मृताच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ढेकोळवाडी, ढेकोळी ग्रामस्थांनी कारखाना गेट समोर रविवारी रात्री ठिय्या मांडला. त्यामुळे कारखाना स्थळावर रात्री उशिरापर्यंत वातावरण तणावपूर्ण बनले होते. घटनेची नोंद चंदगड पोलिसात करण्यात आली आहे. 

कुठुंबियांचे कारखाना प्रशासनाच्या मदतीकडे लक्ष

गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील इको केन शुगर कारखान्यात अपघातात मृत झालेल्या कामगाराला प्रशासनाकडून भरीव मदत मिळाली होती.त्याच धर्तीवर मयत गुडू पाटील या कामगाराला मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment