चंदगडी बोली भाषेतील कविता गाजणार दिल्लीच्या तख्तावर, कोवाडचे प्रा. रामदास बिर्जे यांचे होणार काव्यवाचन - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2024

चंदगडी बोली भाषेतील कविता गाजणार दिल्लीच्या तख्तावर, कोवाडचे प्रा. रामदास बिर्जे यांचे होणार काव्यवाचन

प्रा. रामदास बिर्जे
तेऊरवाडी / एस. के. पाटील
     साहित्य अकादमीच्या वतीने दिल्ली येथे आयोजित केल्या केलेल्या जगातील सर्वात मोठ्या सहित्योत्सवासाठी चंदगडी बोलीतील कवितांसाठी कोवाड (ता. चंदगड) येथील प्रा. रामदास बिर्जे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.   चंदगडी बोली भाषेतील कविता राजधानी दिल्लीत वाचली जाणार  असल्याने चंदगडचा आवाज दिल्ली मध्ये घुमणार आहे.                           दि.11 मार्च ते 16 मार्च दरम्यान दिल्लीतील रवींद्र भवन येथे आयोजित या महा सहित्योत्सवात हजोरोंच्या वर साहित्यिक, विद्वान मंडळी, गुणवंत व्यक्ती हजेरी लावणार आहेत.साहित्यावर दीडशेहून अधिक चर्चासत्र होणार असून शंभर भारतीय भाषांमध्ये कवितांचे सादरीकरण होणार आहे. त्यामध्ये प्रा.रामदास बिर्जे यांना त्यांच्या स्वरचित चंदगडी बोलीतील कविता 'चंदगडी 'व त्याच कविता हिंदी भाषेमध्ये अनुवादित करून सादर करावयाच्या आहेत. त्यांच्या या चंदगडी बोलीतील साहित्य वाटचालीसाठी शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर येथे अध्यापनाचे कार्य करणाऱ्या प्रा रामदास बिर्जे यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत .तसेच विविध दिपावळी अंकामध्ये हजारो कथा प्रसिद्ध झाल्या आहेत . पद्मश्री कै रणजित देसाई यांच्या साहित्य भूमित जन्मलेल्या प्रा रामदास बिर्जे यांच्या चंदगडी बोली भाषेतील कविता आता दिल्लीतही गाजणार  असल्याने चंदगड तालूक्यातील साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment