निपाणीची क्रांती मोरे ठरली 'एम टेक' ची गोल्ड मेडॅलिस्ट - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2024

निपाणीची क्रांती मोरे ठरली 'एम टेक' ची गोल्ड मेडॅलिस्ट

कु. क्रांती उत्तम मोरे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   बेळगाव (कर्नाटक) येथील एस जी बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या 'सर विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ' ची विद्यार्थिनी कुमारी क्रांती उत्तम मोरे हिने 'स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग' (एम टेक) विभागात सुवर्णपदक पटकावले आहे. क्रांती ही यमगर्णी, ता. निपाणी, जि. बेळगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील असून तिने कष्टपूर्वक अभ्यासातून सुवर्णपदकासह एम टेक पदवी मिळविली आहे. या यशाबद्दल निपाणी व सीमा भागातून तिचे कौतुक होत आहे. तिला प्राचार्य डॉ बी आर पटगुंडी, विभाग प्रमुख डॉ के बी प्रकाश व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन तर आई सौ रंजना व वडील उत्तम सदाशिव मोरे यांचे प्रोत्साहन लाभले. 

No comments:

Post a Comment