पाणी वाचलं तर भविष्यात आपण वाचू - प्राचार्य रायकर, वांद्रे बी एड कॉलेजमध्ये जल दिना निमित्त पथनाट्य स्पर्धा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2024

पाणी वाचलं तर भविष्यात आपण वाचू - प्राचार्य रायकर, वांद्रे बी एड कॉलेजमध्ये जल दिना निमित्त पथनाट्य स्पर्धा संपन्न


चंदगड / प्रतिनिधी
       पाण्याची बचत करणे काळाची गरज बनली आहे. पाणी वाचवलं तरच भविष्यात आपण वाचू. जल दिन आहे म्हणून पाणी वाचवा पाणी आडवा असा संदेश न देता तो आपण दररोज अंगीकरला तरच तो खऱ्या अर्थाने भविष्यात उपयोगी पडेल'असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. एम. रायकर यानी केले. ते तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत महादेवराव बी एड कॉलेज मध्ये जागतिक जल दिनानिमित्त आयोजित पथनाट्य स्पर्धे दरम्यान बोलत होते. अध्यक्षस्थानी महादेवराव वांद्रे होते.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ग. गो. प्रधान यानी केले. अध्यक्षीय भाषणात श्री. वांद्रे यांनी शिक्षकाने परिपूर्ण असलं पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षक सुध्दा स्पर्धा परीक्षेद्वारे निवडला जाणार आहे. या स्पर्धेच्या युगात टीकायच असेल तर विद्यार्थ्यांनि अभ्यास करून यश मिळवले पाहिजे असे सांगितले. यावेळी जागतिक जल दिनानिमित्त भित्तीपत्रिकाचे उद्घाटन, पोस्टर सादरीकरण करण्यात आले. यावेळी पथनाट्य स्पर्धेतील विजेत्या संघाना गौरविण्यात आले. या स्पर्धेत अनुक्रमे महादेवराव बी. एड. कॉलेज द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक डी. के. शिंदे (बी. एड. कॉलेज गडहिंग्लज), तृतीय क्रमांक महादेवराव बी. एड. कॉलेज प्रथम वर्षे यांनी नंबर पटकावले. पथनाट्य स्पर्धेचे परीक्षण सौ. मोनाली परब व पूजा सुतार यांनी केले.

   यावेळी  प्र. प्राचार्य एन. जे. कांबळे, संचालिका मृणालिनी वांद्रे, एस. आर. देशपांडे, प्राध्यापक एम. आर. मुल्ला, एस. पी. गावडे, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्या पाटील यांनी केले तर आभार एन. जे. कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment