कोदाळी येथील माऊली देवीच्या यात्रौत्सवाला १ एप्रिल पासून सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2024

कोदाळी येथील माऊली देवीच्या यात्रौत्सवाला १ एप्रिल पासून सुरवात

कोदाळी (ता. चंदगड) येथील श्री माऊली देवीची चांदीची मुर्ती


चंदगड / प्रतिनिधी
     चंदगड तालुक्यासह बेळगाव, गोवा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोदाळी 
ता.चंदगड येथील  ची यात्रा सोमवार दि. १ एप्रिल २०२४ ते ३ एप्रिल २०२४ अखेर संपन्न होणार आहे.
कोदाळी (ता. चंदगड) येथील श्री माऊली देवीचे मंदिर 

      सोमवार दि.१ रोजी रात्री जागरानिमित्त राजवंस हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे. मंगळवार दि. २ रोजी- सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून   ११ वाजता महाप्रसादाला सुरुवात  होणार आहे. दुपारी ३ वा. माऊली देवीचा पालखी उत्सव साजरा होणार असून रात्री११ वाजता दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तर बुधवार दि ३ रोजी सकाळी नवस फेडणे, मागणी मागणे, गाऱ्हाणे घालणे कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेचा लाभ सर्व भाविक भक्तानी घ्यावे असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

No comments:

Post a Comment