चंदगड तहसील कार्यालय येथे मतदार चिट्ठ्यांचे वाटप, 30 एप्रिल ते 3 मे पर्यंत दिव्यांग व 85 पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदार घरातूनच करणार मतदान - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2024

चंदगड तहसील कार्यालय येथे मतदार चिट्ठ्यांचे वाटप, 30 एप्रिल ते 3 मे पर्यंत दिव्यांग व 85 पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदार घरातूनच करणार मतदान

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        आगामी लोकसभा निवडणूक दिनांक 7 मे 2024 रोजी संपन्न होत असल्याने तालुक्यातील सर्व मतदारांना मतदानाचा अनुक्रमांक समजण्यासाठी तालुक्यातील सर्व मतदारांना निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने मतदार चिठ्ठ्या वाटप मार्गदर्शन कार्यशाळा चंदगड तहसील कार्यालय येथे निवडणूक नायब तहसीलदार एस एन दळवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. 

        दिनांक 7 मे 2024 रोजी कोल्हापूर लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून मतदान प्रक्रिया अतिशय सुलभ होण्याच्या दृष्टीने आणि मतदाराला आपल्या मतदार यातील अनुक्रमांक समजण्याच्या दृष्टीने सर्व मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप कसे करावे याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा निवडणूक नायब तहसीलदार एस एन दळवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी तांत्रिक सहाय्यक निहाल मुल्ला यांनी ही प्रक्रिया अतिशय सुलभ होण्याच्या दृष्टीने तालुक्यातील सर्व बूथ लेवल ऑफिसर वर्गाने सहकार्य करून मतदारांना त्यांच्या मतदार चिठ्ठ्या दिनांक 30 एप्रिल पर्यंत घरपोच करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मतदाराला मतदान करताना आपल्याला कोणकोणत्या प्रक्रियांना सामोरे जावे लागणार याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये भारत निर्वाचन आयोगामार्फत हुशार मतदार व्हा. यासाठी मतदार मार्गदर्शिका घरपोच करण्याबाबत मार्गदर्शन केले असून या मतदार मार्गदर्शकेच्या साह्याने मतदाराला आपले मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडावी लागणार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

    तसेच दिनांक 30 एप्रिल ते 3 मे च्या दरम्यान तालुक्यातील सर्व दिव्यांग व 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या परंतु मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी असमर्थ असणाऱ्या मतदाराला त्याला त्याच्या घरातून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी यावर्षी प्रथमच ही यंत्रणा राबवल्या असल्यामुळे ती यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महसूल सहाय्यक अमर साळुंखे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व गावांमधील काम करणाऱ्या पर्यवेक्षक आणि सुपरवायझर यांना त्या त्या गावच्या मतदार चिठ्ठ्या आणि मार्गदर्शक पुस्तिका चे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment