'अपेडा'च्या तज्ज्ञ संचालकपदी चंदगड तालुक्यातील गुडेवाडी येथील डॉ. परशराम पाटील यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2024

'अपेडा'च्या तज्ज्ञ संचालकपदी चंदगड तालुक्यातील गुडेवाडी येथील डॉ. परशराम पाटील यांची निवड

डॉ. परशराम पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुक्यातील गुडेवाडी (ता. चंदगड) येथील सुपुत्र आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांची केंद्र सरकारने अपेडा (अॅग्रीकल्चरल अँड प्रोसेसड फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथोरिटी) या संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड केली आहे. 

     डॉ. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातून कृषी अर्थशास्त्रात डॉक्टरेट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून फॉरेस्ट इकॉनॉमिक्समध्ये पोस्ट डॉक्टरेट अभ्यास पूर्ण केला आहे. ते प्रतिष्ठित नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी फेलो आहेत. सध्या भारतीय कृषी निर्यात स्पर्धात्मकतेवर काम करतात. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी, अर्थशास्त्र, वन, लेखा, हवामान बदल या क्षेत्रांतील शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभव आहे. 

No comments:

Post a Comment