वैजनाथ देवालय पालखी व सासनकाठी सोहळा संपन्न, मंगळवारी महाप्रसाद - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2024

वैजनाथ देवालय पालखी व सासनकाठी सोहळा संपन्न, मंगळवारी महाप्रसाद

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         श्री क्षेत्र वैजनाथ देवालय येथे पालखी व सासनकाठी सोहळा संपन्न झाला. रविवार दि. २१ रोजी रात्री प्रथा परंपरे प्रमाणे १२.३५ मि. श्री वैजनाथ आणि आरोग्य भवानी माता यांचा भगवान शिव पार्वती रुपात विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मंदिरासभोवती पालखी व सासनकाठी वाजत गाजत पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आल्या. यावेळी कडोली, देवरवाडी, बेळगाव सीमाभागातील तसेच पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्तांनी शिव पार्वती विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. आज दिनांक २२रोजी भर दवणा यात्रा असून मंगळवारी दिनांक २३ भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार समितीने केले आहे.

No comments:

Post a Comment