अप्पी पाटील यांचा 'शाहू छत्रपती' यांना पाठिंबा...! 'चंदगड' मतदारसंघातून 'महाविकास आघाडी' ला फायदा - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2024

अप्पी पाटील यांचा 'शाहू छत्रपती' यांना पाठिंबा...! 'चंदगड' मतदारसंघातून 'महाविकास आघाडी' ला फायदा

महागाव येथील मेळाव्यात अप्पी पाटील समर्थकांनी केलेली गर्दी
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   चंदगड विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते व केडीसीसी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन विनायक उर्फ अप्पी पाटील (महागाव) यांनी महागाव (ता. गडहिंग्लज) येथे हजारो कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात महाविकास आघाडी मधील राष्ट्रीय काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अप्पी पाटील यांच्या या घोषणेमुळे चंदगड विधानसभा मतदार संघातून शाहू महाराज यांचे मताधिक्य वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अप्पी पाटील यांचे स्वागत करताना विद्याधर गुरबे, अजिंक्य चव्हाण, रामदास पाटील, प्रशांत देसाई, प्रा. पी डी पाटील आदी

  २०१९ मध्ये चंदगड विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असलेल्या अप्पी यांचा त्यावेळी निसटता पराभव झाला असला तरी त्यांनी सुमारे ५० हजार मते घेतली होती. अप्पी पाटील यांच्या निर्णयामुळे यातील बहुतांशी मते महाविकास आघाडी पर्यायाने शाहू महाराजांच्या पारड्यात पडणार आहेत. मेळाव्यानंतर अप्पी पाटील यांची राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरवे यांनी भेट घेऊन त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचे काँग्रेस कमिटी गडहिंग्लज व महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करून आभार व्यक्त करत प्रचार रणनीती बाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत मविआ चे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment