चंदगड / प्रतिनिधी
नागवे (ता. चंदगड) वन हद्दीमध्ये शुक्रवारी (ता. २९) रात्री शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एकास चंदगड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. गोपाळ धोंडीबा गुरव (वय ७०, रा. नागवे) असे संशयिताचे नाव आहे. त्याला चंदगड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता एक दिवसाची वन कोठडी देण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी, वनपाल के. एस. डेळेकर, वनरक्षक आकाश मानवतकर , सागर कोळी, वनसेवक गुंडू देवळी हे वन्यजीव बचाव पथकासहनागवे हद्दीत रात्री गस्त घालत असताना जंगलालगतच्या मालकी क्षेत्रात संशयास्पद बॅटरीची हालचाल दिसून आली. तत्काळ त्या क्षेत्राची तपासणी केली असता गोपाळ धोंडिबा गुरवहा विनापरवाना सिंगल बोअर काडतूस बंदूक खांद्याला लावून, कपाळावर बॅटरी लावून वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या राहत्या घराची व परिसराची तपासणी केली असता परिसरालगत भेकराच्या चामड्याचा अर्धवट केसाळ तुकडा मिळून आला. वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले अधिक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment