कोवाड येथे 'घरकुल ट्रेडर्स'चे आज उद्घाटन, घरासाठी लागणारे सर्व साहित्य मिळणार एकाच छताखाली ..! - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2024

कोवाड येथे 'घरकुल ट्रेडर्स'चे आज उद्घाटन, घरासाठी लागणारे सर्व साहित्य मिळणार एकाच छताखाली ..!



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      कोवाड (ता. चंदगड) येथे कोवाड- बेळगाव रोडवर घरकुल ट्रेडर्स या दुकानाचे उद्घाटन उद्या मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होत आहे. घर उभारणीनंतर ते परिपूर्ण करण्यासाठी लागणारे हार्डवेअर, प्लंबिंग, सॅनिटरी वेअर, पेंट्स असे ब्रँडेड कंपन्यांचे सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याची सोय या ठिकाणी होणार आहे. याशिवाय प्लंबर, वेल्डर, फिटर, गवंडी यांना आपल्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य शोधण्यासाठी शहरात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

       प्रणित प्रकाश नांदूडकर व निखिल प्रकाश नांदूडकर बंधूंनी सुरू केलेल्या या शोरूम व विक्री केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या ११ वाजता होत आहे. यावेळी सर्व हितचिंतक, हार्डवेअर, पेंटिंग, प्लंबिंग क्षेत्रातील व्यावसायिक, कारागीर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रकाश नांदूडकर सर (किणी) व परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment