पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पुणे येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेमार्फत राज्यातील कला, क्रीडा, सामाजिक आदी क्षेत्रात उज्ज्वल व समाज उपयोगी प्रबोधनपर उल्लेखनीय कार्य केलेल्या शाळा व संस्थांचा दरवर्षी गौरव केला जातो. यंदा संस्थेमार्फत राज्यातील १७० शाळांचे परीक्षण करण्यात आले. यात विविध स्पर्धांत शाळेने केलेले कार्य, मार्गदर्शक उपक्रम, नवोपक्रम, समाज प्रबोधनपर उपक्रम यांची पाहणी करून क्रमांक देण्यात आले. यात ढोलगरवाडी ता. चंदगड शाळेने गेल्या ६० वर्षांपासून पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या सापांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून साप हा शेतकऱ्यांचा पर्यायाने समाजाचा मित्र असल्याचे प्रबोधनातून दाखवून दिले आहे. सुमारे सहा दशके हे कार्य कोणतेही शासकीय अनुदान नसताना सुरू ठेवले आहे. या कार्याची दखल मातृ मंदिर संस्थेने घेतली. ज्ञान प्रबोधिनी विद्यालय निगडी पुणे येथे रोख रक्कम व चषक देऊन शाळेला गौरवण्यात आले. शेतकरी शिक्षण मंडळ संचलित मामासाहेब लाड विद्यालय, ज्युनिअर कॉलेज ढोलगरवाडी सलग्न सर्पालय च्या वतीने सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
No comments:
Post a Comment