शिवतेज फाउंडेशन च्या वतीने संभाजी राजे छत्रपती यांचे स्वागत करताना जे एस पाटील व मंडळाचे कार्यकर्ते |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगडच्या स्वाभिमानी जनतेचं ठरलंय छत्रपती शाहू महाराजांस्नं खासदार करतलंच...! चंदगड तालुक्यातील गावोगावी मतदार संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने मतदार व जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना मिळत आहे. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत चंदगड तालुक्याने मला जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य दिले होते. राजर्षी शाहूंच्या समतेचा, पुरोगामी विचार व वारसा घेऊन निवडणूक उतरलेल्या आपल्या वडिलांना चंदगडची जनता या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देईल असा विश्वास माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केला. कालकुंद्री येथील कल्मेश्वर मंदिर परिसरात महाविकास आघाडीतील मित्र पक्षांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाविकास आघाडी तथा काँग्रेसच्या हात या चिन्हावरच आपले बहुमोल मत द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक विजय कोकितकर यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते एम जे पाटील, दौलत चे माजी संचालक शिवाजी पाटील, सरपंच छाया जोशी, माजी सरपंच आप्पाजी वरपे, शिवाजी जाधव, शिवाजी नाईक, रामू जोशी शिवसेना शाखेचे सर्व शिवसैनिक, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी व दूध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवतेज फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी राजे यांची भेट घेऊन शाहू महाराजांना पाठिंबा व्यक्त केला. फाउंडेशनच्या वतीने त्यांचे स्वागत जे एस पाटील यांनी केले. यावेळी सुभाष पाटील, सदानंद पाटील, सिद्धाप्पा नाईक, विठोबा पाटील, अशोक जोशी, संजय पाटील, शंकर मुर्डेकर, दत्तू कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
आजच्या दौऱ्यात चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी, दुंडगे, कोवाड, कागणी, किणी, होसूर, किटवाड, कुदनूर, कालकंद्री आदी गावांना भेटी देऊन संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
No comments:
Post a Comment