सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचे सुपुत्र अभिनव यांचा शुभविवाह थाटामाटात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2024

सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचे सुपुत्र अभिनव यांचा शुभविवाह थाटामाटात संपन्न

 

निापणी येथे अभिनव यांच्या विवाहप्रसंगी शुभेच्छा देताना चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       निपाणी येथील दिवंगत स्वातंत्रसैनिक कै. गोविंदराव चव्हाण व कै. श्रीमती कृष्णाबाई यांचे नातू व 7 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये सेवेत असलेले सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण व सौ. कविता यांचे चिरंजीव अभिनव व यमगर्णी (ता. निपाणी) येथील सौ. रंजना व उत्तम सदाशिव मोरे यांची सुकन्या चि. सौ. कां. क्रांती यांचा शुभविवाह निपाणी येथील संजय लॉन मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.

       स्वागत सुभेदार मेजर रवींद्र गोविंद चव्हाण (काका), सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण व परिवार यांनी केले. या शुभविवाह प्रसंगी विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभाशिर्वाद दिले.

     यावेळी आमदार शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष देसाई, बुडाचे अध्यक्ष व चिकोडी जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव इंगळे, अरिहंत बँक अध्यक्ष उत्तम पाटील, संजय लॉनचे मालक डॉ. सौ. व श्री. कस्तुरे, चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, संस्थापक अनिल धुपदाळे, सी एल न्यूज चे संपादक संपत पाटील, पत्रकार चेतन शेरेगार, अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ गुजरात चे अध्यक्ष डॉ. राजूभाई पाटील, डॉ विशांत निर्मळे, नगरसेविका अनिता पठाडे, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, के. आर. डी. सी. एल. चे इंजिनिअर सुनील बल्लोळ, प्रोब्स क्लब अध्यक्ष पुंडे व वसंत नगरे, हालसिद्धनाथ शुगरचे माजी अध्यक्ष चंदूकाका कोठीवाले, सिल्क हाऊसचे मालक गजानन शिंदे आदी प्रमुख मान्यवरांसह चंदगड व निपाणी तालुका पत्रकार संघ पदाधिकारीव सदस्य, निपाणी व कागल परिसरातील आजी माजी सैनिक संघटना, 7 मराठा व 12 मराठातील आजी-माजी सैनिक, नेचर क्लब व चड्डी दोस्त मित्र मंडळ, एक खांबी गणेश मंदिर ट्रस्ट सदस्य, दौलतराव फाउंडेशन हॉलीबॉल ग्रुप, निपाणी नगरपरिषद आजी-माजी सदस्य व पदाधिकारी यांच्यासह आप्तेष्ट, नातेवाईक व मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment