शिनोळी बुद्रुक येथे २८ वर्षानंतर भरणार महालक्ष्मी यात्रा, १४ मे रोजी होणार यात्रेला प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2024

शिनोळी बुद्रुक येथे २८ वर्षानंतर भरणार महालक्ष्मी यात्रा, १४ मे रोजी होणार यात्रेला प्रारंभ

 

अगसगे येथून रथाचे साहित्य आणण्यासाठी गावातून निघताना यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील महालक्ष्मी यात्रा तब्बल २८ वर्षानंतर भरणार आहे. मंगळवार दि. १४ मे २०२४ पासून यात्रा प्रारंभ होईल. देवीच्या रथासाठी अगसगे (ता. बेळगाव) येथून नुकतेच १४ ट्रॅक्टर मधून आणण्यात आले.

       यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबू ज. पाटील, उपाध्यक्ष बाबू ई. पाटील, परशराम पाटील, जोतिबा तानगावडे, मारुती देवण, श्रीपती गुडेकर, नितीन पाटील, विनोद पाटील, प्रा. एन. डी. बोकमूरकर, शिवाजी मेणसे, दयानंद रेडेकर, यशवंत डागेकर, कृष्णा सुतार, प्रकाश गावडे, जोतिबा पाटील आदी उपस्थित होते.

     महालक्ष्मी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन तयारीला लागले आहे. सरपंच गणपत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य रथाला अडथळा ठरणारे गावातील विद्युत खांब व तारा बदलण्यासह विविध विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी राबत आहेत. आज दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता मरगाई मंदिराजवळ यात्रेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

No comments:

Post a Comment