चंदगडच्या विकासाला शाहू छत्रपती महाराज प्राधान्य देतील : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, चंदगड तालुक्याच्या वाड्यावस्तीवरील महिलांशी साधला संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2024

चंदगडच्या विकासाला शाहू छत्रपती महाराज प्राधान्य देतील : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, चंदगड तालुक्याच्या वाड्यावस्तीवरील महिलांशी साधला संवाद

 

शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारानिमित्त तडये (ता. चंदगड) येथे महिलांशी संवाद साधताना संयोगिताराजे छत्रपती, डॉ. नंदाताई बाभुळकर, शीतल पाटील, अनिल दळवी, इतर पदाधिकारी व ग्रामस्थ.

चंदगड / प्रतिनिधी 

      चंदगड सगळ्यांत शेवटचा तालुका असल्याने आम्हाला कुठेतरी विकासात झुकते माप मिळते, अशी एक शंका येथील जनतेच्या मनात राहते. पण अशी कोणतीही शंका घेण्याचे अजिबात कारण नाही, कारण छत्रपती घराणे आणि चंदगड हे एक घरचे नाते आहे. इथल्या जनतेने आमच्यावर नेहमीच प्रेम केले आहे. शाहू छत्रपती महाराजांच्या विजयात चंदगडचा वाटा मोठा असेल हा विश्वास आहे. त्याच विश्वासाने सांगते की, चंदगड तालुक्याच्या विकासाला शाहू छत्रपती महाराज प्राधान्य देतील, असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले. 

        शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती चंदगड तालुक्याचा जनतेशी, महिलांशी संवाद साधत आहेत.त्यांनी कोलिक, तुडये, हाजगोळी, शीनोळी, तुर्केवाडी येथे प्रचार दौरा केला. दरम्यान त्यांनी तुडये व यशवंतनगर येथील काजू कारखान्याला भेट दिली. कारखान्याची पाहणी करत कामगारांशी चर्चा केली. 

       डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, ``सर्वांप्रति आदर असणारे, शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेणारे शाहू महाराज हे आपले उमेदवार आहेत. ते निश्चित विजयी होणार. शाहू महाराज हे खासदार म्हणून एकटेच आपल्यासोबत नाहीत तर दुसरे खासदार म्हणून संभाजीराजेही चंदगडसाठी कार्यरत असणार आहेत. संयोगिताराजेही आपल्याबरोबर असणार आहेत. शीतल पाटील म्हणाल्या, उमेदवार शाहू महाराज हे हे अत्यंत सरळ आणि सुस्वभावी आहेत. आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव त्यांनी उमेदवारी स्वीकारली, त्याच आग्रहाने जास्तीत जास्त मताधिक्य महाराजांना देऊन विजयी करू. ही लढाई गद्दारी विरुद्ध निष्ठेची आहे.``

       शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, पाच वर्षापूर्वी या गावाला एवढा फंड त्या गावाला एवढा फंड देतो म्हणून सांगून गेले ते निवडून आल्यानंतर इकडे फिरकलेच नाहीत. पक्षाशी व जनतेशी गद्दारी केलेल्यांना आता धडा शिकवायचा आहे. माजी जि. प. सदस्या विद्या विलास पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रूपाताई खाण्डेकर, नंदिनी पाटील,शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अनिल दळवी, माजी पं स सदस्या चंद्रकला बामुचे, ठाकरे गट संघटक शांताताई जाधव, महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर, एम.जे.पाटील, माजी जि. प. सदस्य बी. डी. पाटील, दौलत कारखान्याचे माजी संचालक गोपाळ उळकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, सरपंच शीतल पवार, एम.एन.पाटील, उपसरपंच पूनम खांडेकर, अक्षय करंबळकर, आदीसह कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment