मुख्याध्यापक विलास पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पार्ले केंद्राचे केंद्रप्रमुख व कळसगादे (ता. चंदगड) येथील मुख्याध्यापक विलास मारुती पाटील हे आपल्या ३९ वर्षाच्या सेवेनंतर ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा संपत्तीक सत्कार व शुभेच्छा समारंभ बुधवार दि. १ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजता कळसगादे येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित रहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती, कळसगादेचे पालक व समस्त ग्रामस्थ, कळसगादे व पार्लेचा शिक्षक स्टाफ व शिक्षक परिवार चंदगड यांच्या वतीने करण्यात आलेला आहे.
यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा
विलास मारुती पाटील यांचे मुळ गाव कालकुंद्री. त्यांचा जन्म २० मे १९६६ रोजी कालकुंद्री गावी झाला.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कालकुंद्री येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत झाले. डी. एड्चे शिक्षण कोल्हापूर येथील पेटाळा काॅलेजमध्ये पार पडले. श्री. पाटील यांची नोकरीची सुरवात १९८५ साली हेब्बाळ हायस्कूल हेब्बाळ-जलद्याळ येथे झाली. त्यांनी येथे १ वर्ष नोकरी केली.
१७ जानेवारी १९८६ रोजी जिल्हा परिषदेच्या म्हाळेवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला सुरवात केली. १९८६ ते १९९८ पर्यंत म्हाळेवाडी येथे सेवा बजावली. १९९८ ला पदवीधर शिक्षक म्हणून कुमार विद्यामंदीर येथे हजर झाले. त्यानंतर हिंडगाव, येणेचवंडी (गडहिंग्लज), खालसा गुडवळे, उमगाव येथे शिक्षक म्हणून काम केले.
१ नोव्हेंबर २०१८ ला मुख्याध्यापक म्हणून कळसगादे येथे प्रमोशनने हजर झाले. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना पार्ले केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून अतिरिक्त पदभार स्विकारला. केंद्राचा उत्कृष्ठ असा कार्यभार सांभाळला. त्यांनी आपल्या शिक्षणाचे पवित्र कार्य करत असताना अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. ३१ मे २०२४ रोजी ते ३९ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृ्त्त होत आहेत.
No comments:
Post a Comment