कळसगादे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळा.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सह्याद्री वाईल्डलाईफ फौंडेशन व रोटरी सनराईज सोशल सेंटर कोल्हापूर यांच्या सहकार्यातून व टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स यांच्या अर्थसहाय्याने मराठी विद्यामंदीर कळसगादे (ता. चंदगड) येथील शाळेमध्ये इमारतीचे स्लायडींग खिडक्या, लाईट फिटिंग, जेवणखोली कोबा, कट्टा दुरुस्ती, २ पाणी टाकीचे नळ दुरुस्ती व गिलावा व प्लम्बिंग इ. कामे करून देण्यात आली. यामुळे शाळेतील विद्यार्थांची गैरसोय दुर झाल्याने कळसगादे ग्रामस्थ यांच्याकडून त्यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी सदस्य आशिष पिलांनी, गोपाल मर्दा, आदित्य जाधव, डॉ. पृथ्वीराज जाधव, निखिल जोशी, मिलिंद घाटगे, रोनक पाटील, सल्लागार गिरिष पंजाबी, प्रकल्पाधिकारी शरद माळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment