अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांच्या चंदगड तालुक्यात गाठीभेटी, चंदगड मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी : बाजीराव खाडे - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2024

अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांच्या चंदगड तालुक्यात गाठीभेटी, चंदगड मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी : बाजीराव खाडे

बाजीराव खाडे

चंदगड (प्रतिनिधी) : 

     लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू असून कोल्हापूर लोकसभेतील अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील नेते, कार्यकर्ते, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला असून गावपातळीवर प्रचाराचा धडाका लावला आहे. यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यातील माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील व भाजप नेते शिवाजीराव पाटील यांची भेट घेतली. तसेच आपली भूमिका स्पष्ट करत आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली.‌

    यावेळी गेल्या २८ वर्षापासून राष्ट्रीय काँग्रेसचे विचार जनमाणसात पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले. पक्षाने साधी दखलही घेतली नसल्याची खंत खाडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. तसेच आपल्याला चंदगड मतदारसंघातून चांगला पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी आहे. माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या वाट्याला ही परिस्थिती ओढावत असेल तर भविष्यात तुम्हालाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे हिच वेळ असून योग्य निर्णय घेऊन ऊस शेतकरी असलेल्या चित्रा समोरील बटण दाबून आपणास विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment