महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी होणार संकेतस्थळावर जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2024

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी होणार संकेतस्थळावर जाहीर

 


मुंबई : वृत्तसेवा

      महाराष्ट्र राज्याचा बारावीच्या निकालाची वाट सगळे विद्यार्थी पाहत आहेत. अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबतचे अधिकृत सूचना देखील जाहीर झालेली आहे. 

    आता अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली आहे. उद्या 21 मे रोजी दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. आणि विद्यार्थ्यांना तो पाहता देखील येणार आहे. यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी या दरम्यान झाली. यावर्षी राज्याची जवळपास 15.13 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्यामध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. दरवेळी प्रमाणे यंदा देखील राज्यात संपूर्ण परीक्षा ही कॉपीमुक्त पार पडली आहे. बारावीचा निकाल 9 विभागांमध्ये लागणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. कोणत्या विभागातील विद्यार्थ्यी बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 


कोठे पहाल निकाल

1) mahresult.nic.in

2) mahahsscboard.in

3) hsc.mahresults.org.in

4) hscresult.mkcl.org

5) results.gov.in


No comments:

Post a Comment