शेतातील फळझाडांना रक्षा विसर्जित करताना पाटील कुटुंबीय
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील कै. अनुसया गोविंद पाटील यांचे (शनिवार दि. 18 मे रोजी) वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी रक्षा विसर्जन दिवशी विष्णू पाटील व बाबाजी पाटील या दोन्ही भावंडांनी रूढी, परंपरेला फाटा देत प्रदूषण टाळत गावामध्ये प्रथमच विधायक कार्याची आपल्यापासून सुरुवात करतात. शेतातील फळझाडांना रक्षा विसर्जित करून समाजासमोर आदर्श घालून दिला आहे.
पारंपरिक पद्धतीने रक्षाविसर्जन नदीत करण्याची प्रथा आहे. पण या प्रथेमुळे नदीच्या पाण्याचे प्रदूषण कसे भयानक होते. याची जाणीव ठेवत शेतातील झाडांना रक्षा विसर्जित करण्याचा निर्णय घेत सांबरे गावामध्ये एक प्रकारचा समाज प्रबोधनाचा संदेश ठेवला आहे. यावेळी त्यांची मुले अनुक्रमे दिगंबर आणि अथर्वा यांच्या करवी शेतामधील फळझाडांना रक्षा विसर्जित करण्यात आली. यावेळी उपसरपंच शंकर पाटील, शिवाजी आंबेडकर, नागोजी पाटील, विनायक दोरुगडे, शिवाजी पाटील व पत्रकार संजय पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment