खेडूत शिक्षण मंडळ बहुजना'च्याकडे - अॅड. एस. आर. पाटील यांची प्रसिद्धी पत्रकातून माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2024

खेडूत शिक्षण मंडळ बहुजना'च्याकडे - अॅड. एस. आर. पाटील यांची प्रसिद्धी पत्रकातून माहिती

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील खेडुत शिक्षण मंडळ कालकुंद्रीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा आदेश उच्च न्यायालय मुंबई यांनी दिला. त्यामूळे बहूजनानी स्थापन केलेली शिक्षण संस्था चंदगड तालुक्यातील सर्व सामान्य व सेवाभावी लोकांच्याकडे जाण्याचा मार्ग निश्चित झाला आहे. अशी माहिती अॅड. एस. आर. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

1953 साली कालकुंद्री (ता. चंदगड) येथे खेडूत शिक्षण मंडळाची स्थापना झाली. शेतकरी कष्टकरी समाजातील मुलांची शिक्षणाची सोय करण्यासाठी बहूजनांचे नेते अॅड लाड मामा, भाई दाजिबा देसाई , नरसिंगराव भुजंगराव पाटील, तुकाराम दत्ताजी पवार, व्ही. एस. पाटील, के. जी. पाटील आदीनी तालुक्यातून धान्य व पैसा जमा करून शिक्षणाचे रोपटे कालकुंदी गावात लावले. त्याचा वटवृक्ष होऊन संपूर्ण तालुका प्रगतशील झाला. याकामी अनेकांचे हातभार लागले. एस. वाय. पाटील, एल वाय पाटील, गोविंदराव पवार, र. भा. माडखोलकर, एस. एन. पाटील, एस एस पाटील, कोनेरी सर, के. जी. शिनोळकर या लोकांनी अतोनात मेहनत करून संस्था नावारूपाला आणली.

मात्र संस्था सेवाभावी व बहुजन समाजाची असताना 2017 साली काही अनिष्ठ व घराणेशाही प्रवृत्तीच्या लोकांनी संस्था ताब्यात घेण्यासाठी जेष्ठ व अनुभवी लोकांना बाजूला सारले. मागील दाराने घरातले खाजगी संचालक मंडळ करून संस्था हडप करण्याचा प्रयल केला. त्या खल प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी कै. लक्ष्मण विठोबा जाधव व रामाणा पाटील यांनी धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे दाद मागितली, त्यामूळे ते बनावट मंडळ बरखास्त झाले.

धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी 1999 च्या सभासदावर निवडणूक घ्यावी असा आदेश केला. तसेच घटना दुरूस्तीस परवानगी दिली. असे असताना काही सभासद उच्च न्यायालयात गेले उच्च न्यायालय मुंबई यांनी घटना दुरूस्ती अमान्य ठरवली व 1999 च्या सभासदावर निवडणूक घेण्याचा आदेश केला. तसेच गरज पडल्यास 2017 चे सभासद निवडणूक अधिका-याकडून वैद्य करून घेण्यास व नविन घटना दुरूस्ती करावी असे सुचविले. त्यामूळे आता निवडणूकीचा मार्ग मोकळा होऊन संस्था सेवाभावी व लोकशाही मानणाऱ्या सभासदांच्याकडे येण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामूळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी वर्तमानपत्रात चुकीच्या बातम्या देऊन आपल्या सारखा निकाल लागला असे भासवून सभासदांच्यामध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयल सुरू केला आहे.

गेली सात वर्षे हुकूमशाही प्रवृत्ती असणा-या लोकांच्या विरूध्द सर्वसाधारण सभासदांचे नेते अॅड. एस. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली धर्मादाय आयुक्त कोल्हापूर ते उच्च न्यायालय मुंबई पर्यंत न्यायालयीन लढाई लढवून निवडणूक खेचून आणली आहे. त्यामूळे मागील दाराने संस्था घशात घालण्याचा डाव फसला आहे. संस्था बहुजनांच्या ताब्यात यावी, यासाठी संस्थेतील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर यांनी सहकार्य केले' व एकनिष्ठपणे काम पाहिले. सदर न्यायालयीन कामी सभासदांच्या व संस्थेच्या वतीने कोल्हापूर व मुंबई येथे अॅड. एन. एस. पाटील, अॅड कदम, अॅड. आडगुळे यांनी काम पाहिले. त्यामध्ये कान्होबा माळवे व एम. एम. तुपारे या माजी संचालकांचे सहकार्य लाभले. बहुजन समाजाची संस्था बहुजन समाजाकडे रहावी, ती कुणा एकाच्या ताब्यात जावू नये. तसेच लोकशाही मार्गाने मंडळ स्थापन होण्याच्या कामी सर्व हितचिंतक, सभासद व मार्गदर्शक यांनी काम करावे असे अ आवाहन संस्थेचे माजी अध्यक्ष अॅड. एस. आर. पाटील, माजी सचिव प्रा. आर. पी. पाटील व माजी सह सचिव एल. डी. कांबळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment