कालकुंद्री येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर वास्तुशांती कार्यक्रम उद्या पासून ३ दिवस - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2024

कालकुंद्री येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर वास्तुशांती कार्यक्रम उद्या पासून ३ दिवस

कालकुंद्री येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

   कालकुंद्री (ता. चंदगड) येथे भाविकांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहन कार्यक्रम उद्या गुरुवार दि. ९ मे ते शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी संपन्न होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात ९ रोजी मुहूर्तमेढ, ग्रामदैवत अभिषेक व सर्व देवता पूजनानंतर कळस व मूर्ती मिरवणुकीची सुरुवात विठू माऊली मंदिर कोवाड येथून सकाळी १० वाजता होणार असून ती कागणी मार्गे कालकंद्री येथे पोहोचेल. 

   दि. १० रोजी सकाळी ६ वाजता होम हवन, श्री जडेसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (हिरेमठ दोडवाड) यांच्या हस्ते मुर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहन, तुळस पुजन, मंदिर चौकट, गाभारा, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूजन, संत तुकाराम व ज्ञानेश्वर यांचे शिल्प पूजन. दुपारी १२ वाजता कीर्तन व मंदिर लोकार्पण. दुपारी ३ वाजता माहेर वाशिणींचा हळदी कुंकू मेळावा. ६ वाजता हरिपाठ, रात्री ९ वाजता कीर्तन व जागर भजन. 

   दि. ११ रोजी सकाळी ५ वाजता काकड आरती, ७ वाजता कला कीर्तन, ९ वाजता माऊली अश्वरिंगण, उभे रिंगण व गोल रिंगण तर दुपारी ११ ते ४ महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता सुगम संगीत गायन असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बांधकाम कमिटी व भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment