आदर्श सरपंच भास्कर पेरे- पाटील यांचे निट्टूर येथे १० रोजी व्याख्यान - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2024

आदर्श सरपंच भास्कर पेरे- पाटील यांचे निट्टूर येथे १० रोजी व्याख्यान

भास्कर पेरे- पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

   निट्टूर (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत व आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने पाटोदा चे डबल राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालय चौक निट्टूर येथे शुक्रवारी दि. १० मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

  पाटोदा, (ता. जि. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद) या आपल्या गावात ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच, सरपंच अशी पदे भुषववताना भास्करराव पाटील यांनी राबवलेले हागणदारी मुक्त गाव, वृक्षारोपण आदी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राज्याला व देशाला दिशादर्शक ठरले आहे. त्यांना या कार्याबद्दल दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम व प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते) तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर पाटोदा गावाला महाराष्ट्र राज्यातील आदर्श ग्राम पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या अनुभवाचा उपयोग चंदगड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिकांना व्हावा या उद्देशाने त्यांचे मार्गदर्शन व प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आभार बहुउद्देशीय संस्था व ग्रामपंचायत निट्टूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment