कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामस्थ व भाविकांच्या देणगीतून बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती, कळसारोहन नंतर शेवटच्या दिवशी गोल रिंगण, उभे रिंगण व महाप्रसाद कार्यक्रम पार पडले. पहिल्या दिवशी श्री विठ्ठल- रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या मूर्ती तसेच कळस मिरवणूक कोवाड येथील ताम्रपर्णी नदीघाट ते कागणी मार्गे कालकुंद्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी कालकुंद्री येथील मुस्लिम समाजाच्या वतीने ५ किमी मिरवणूक मार्गावरील हजारो भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दि ९ ते ११ मे २०२४ तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता अश्वरिंगण व महाप्रसादाने झाली.
गोल रिंगण शुभारंभ रामराव पाटील अध्यक्ष कालकुंद्री ग्रामस्थ मंडळ मुंबई व सदस्य यांच्या हस्ते तर उभे रिंगण अरविंद शिंदे (पंढरपूर), अशोक पाटील, मनोहर पाटील, सुरेश गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. महाप्रसाद पूजन दत्तात्रय खवणेवाडकर (कोवाड), रामदास जोशी यांनी केले. यावेळी सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, बांधकाम कमिटी अध्यक्ष पद्माकर पाटील व सदस्य उपस्थित होते. गावच्या माहेरवाशिणी, त्यांचे कुटुंबीय तसेच गाव व पंचक्रोशीतील हजारों भाविकांनी महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घेतला. गावातील विविध गल्ल्या, माहेरवाशिणी व विविध ग्रुप मार्फत मंदिरासाठी कपाटे, फर्निचर, झुंबर अशा विविध वस्तू तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीसाठी आभूषणे देण्यात आली.
या वस्तूंसोबत दुरड्या घेऊन वाजतगाजत येणारे भाविकांचे लोंढे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील, माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. सर्व कार्यक्रम श्रीपाद अवधूत स्वामी (श्री दत्त पादुका मंदिर, श्री क्षेत्र बांगर, जि. देवास मध्य प्रदेश मुळगाव कालकुंद्री) यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे पौरोहित्य रामलिंग हिरेमठ (ऐनापुर) यांनी केले. जयदेव गणाचारी (कोवाड), राजू पुजारी व सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री कल्मेश्वर भक्त मंडळ कालकुंद्री, पंढरपूरचे सर्व सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी दुपारनंतर आलेल्या जोरदार वादळी वारे व पावसामुळे भाविक तसेच खेळणी व अन्य दुकानदारांची एकच तारांबळ उडाली. छत्रपती शिवाजी स्टेडियम वर घालण्यात आलेल्या मंडपाचे ही किरकोळ नुकसान झाले. मोठ्या पावसामुळे माहेरवाशीण हळदीकुंकू मेळावा, सुगम संगीत, सत्कार समारंभ असे काही कार्यक्रम रद्द करावे लागले.
No comments:
Post a Comment