चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
तालुक्यातील बेळगाव वेंगुर्ला महामार्गावरील पाटणे फाटा येथे फोर व्हीलर व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला असून दुचाकी वर मागे बसला एक जण गंभीर जखमी झाला आहे. संध्याकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेने काही काळ वाहतूक टप्प झाली होती.
चंदगड तालुक्यातील बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर पाटणे फाटा येथील तळ्याजवळ वेरना कंपनीच्या फोर व्हीलर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकी वरील मारुती रामू कुट्रे (राहणार बसर्गे तालुका चंदगड) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेले तलाठी कार्यालयाचे कोतवाल पुंडलिक कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. संध्याकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक काय का टप्प झाली होती. मयत दुचाकीस्वार मारुती रामू कुट्रे हे बसर्गे तालुका चंदगड येथील भावेश्वरी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आहेत. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख चंदगड तालुक्याला होती. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे,एक मुलगी व दोन भाऊ असा एकत्र वीस जणांचा मोठा परिवार असून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असल्यामुळे त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची नोंद चंदगड पोलीस ठाण्यात झाली असून पंचनामा करून मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment