पुरस्कार स्वीकारतानाचे फोटो आयुष्याच्या उत्तरार्धात ऊर्जा देण्याचे कार्य करतात...! -अभिनेते सुनील गोडबोले, श्रीकांत पाटील यांना 'महात्मा गांधी राष्ट्रहित सेवा गौरव' पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2024

पुरस्कार स्वीकारतानाचे फोटो आयुष्याच्या उत्तरार्धात ऊर्जा देण्याचे कार्य करतात...! -अभिनेते सुनील गोडबोले, श्रीकांत पाटील यांना 'महात्मा गांधी राष्ट्रहित सेवा गौरव' पुरस्कार प्रदान


चंदगड : सी एल वृत्तसेवा
      पुरस्कार घेतानाचा फोटो काढण्यासाठी केवळ दोन मिनिटे लागतात पण तोच पुरस्कार मिळवण्यासाठी आयुष्य झिजवावे लागते. तेव्हाच कुठे आपल्याला पुरस्कार मिळत असतो. पुरस्कार स्वीकारताना चे असे फोटो आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात ऊर्जा देण्याचे कार्य करतात असे प्रतिपादन दूरदर्शन मालिकांतील ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांनी केले ते शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींना पुरस्कार प्रदान प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

   विद्या मंदिर जक्कनहट्टी (ता. चंदगड) शाळेचे विद्यार्थी प्रिय उपक्रमशील शिक्षक श्रीकांत सुबराव पाटील (मुळ गाव - म्हाळेवाडी, ता. चंदगड) यांना 'महात्मा गांधी राष्ट्रहित सेवा गौरव' पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. 'युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड' संस्थेच्या वतीने श्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या 'एशिया इंडो' संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     डॉ शिवाजीराव शिंदे (असि. रजिस्ट्रार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  विद्यापीठ सोलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली मराठी, हिंदी चित्रपट सृष्टी व दूरदर्शन मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सदानंद सदाशिव (पोलीस उपअधीक्षक कोल्हापूर) यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बी एन खरात (संस्थापक युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ  रेकॉर्ड) यांनी केले.
  असलेल्या पाटील यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात  डोंगराळ व दुर्गम गावात सेवा बजावताना राष्ट्रहित दृष्टीसमोर ठेवून आपल्या शैक्षणिक सेवेत मेहनत, सचोटी व चांगुलपणा ही जीवनातील तत्त्वे सांभाळत विद्यार्थी घडवण्याचे केलेले कार्य राष्ट्रीय उपक्रमात सहभाग व क्रीडा सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 यावेळी कोवाड केंद्र शाळेच निवृत्त केंद्र मुख्याध्यापक व चंदगड तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत पाटील, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे, निवृत्त विस्ताराधिकारी सुधीर मुतकेकर, कोवाड केंद्रप्रमुख बी एस शिरगे, अध्यापक पा रा पाटील, अशोक पाटील, न ल पाटील, सुनील कुंभार, बाळकृष्ण मुतकेकर आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment