बेळगाव- वेंगुर्ले राज्यमार्गावर नागनवाडी नजीक ट्रक- कार अपघात एक ठार, दोन जखमी...! - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2024

बेळगाव- वेंगुर्ले राज्यमार्गावर नागनवाडी नजीक ट्रक- कार अपघात एक ठार, दोन जखमी...!

क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला उभे केलेली ट्रक

                     

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      नागनवाडी (ता. चंदगड) गावानजीक बेळगाव- वेंगुर्ले राज्यमार्गावर ट्रक व ईरटीका कार यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार व दोन जखमी झाल्याची दुर्घटना घडली. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. 

      याबाबत चंदगड पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, बुधवार दि. 12 जून 2024 रोजी रात्री दहाच्या सुमारास अपघातात मयत झालेला ट्रक ड्रायव्हर (याचा नाव व पत्ता अद्याप समजू शकला नाही) आपल्या ताब्यातील चिऱ्यांनी भरलेला ट्रक भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवत असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या एरटिगा कार ला जोराची धडक दिली. नागणवाडी गावचे हद्दीत हनुमान मंदिरासमोरील वळणावर झालेल्या या अपघातात इरटीका कार मधील जोस्त्ना संकेत लब्दे व विकास राउत दोघे (रा. देवगड, जि. सिंधुदुर्ग) हे जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद जखमींचे नातेवाईक गणेश भिकाजी कोयंडे (रा. तुळशीनगर- देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. 

       यावरून मयत ट्रक चालकावर बेदरकारपणे वाहन चालवून दोघांना जखमी केले. जखमींच्या कारचे व स्वतःच्या ताब्यातील ट्रकचे नुकसानी बरोबरच स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल (रजि नंबर :-'221/2024) भा.द.वि.स. कलम 304 (अ), 279, 337, 338, 427 मो. वा. कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पो.हे.कॉ.1436 पाटील करत आहेत.


No comments:

Post a Comment