नागनवाडी येथील चंद्रशेखर बांदिवडेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2024

नागनवाडी येथील चंद्रशेखर बांदिवडेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

 

चंद्रशेखर बांदिवडेकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल धारावी मुंबईचे मुख्याध्यापक चंद्रशेखर गोविंद बांदिवडेकर ३० वर्षांच्या शैक्षणिक सेवेनंतर जूनमध्ये निवृत्त झाले. 

      संत कक्कया विकास सेवा संचलित श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूलमध्ये  चंद्रशेखर बांदिवडेकर यांनी इंग्रजी विषयाचे उत्कृष्ठ असे अध्यापनाचे कार्य केले. अत्यंत मनमिळावू व विद्यार्थी प्रिय असणाऱ्या श्री. बांदिवडेकर यांनी आपली ३० वर्षांची सेवा अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. यापूर्वी सलामवाडी, तुरमुरी येथील ग्रामीण भागातील माध्यमिक शाळामध्ये अध्यापनाचे कार्य करून मुंबई सारख्या शहरातील एका मोठ्या शाळेतही आपली उत्कष्ठ अशी सेवा बजावली. 

     याचीच पोच पावती म्हणून त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मोठ्या प्रमाणात सर्व आजी माजी विद्यार्थी, पत्रकार, संस्था पदाधिकारी, मराठी व इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रशेखर यांचे बंधू ॲड. सतिश बांदिवडकेर यांनीही आपल्या बंधूच्या सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment