कल्लाप्पा भरमू कोले यांचे अतिवृष्टीने पडलेले घर
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
गेल्या पंधरा दिवसात सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीने चंदगड तालुक्यात घरे कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. गेल्या चार दिवसात कालकुंद्री येथे तीन घरे कोसळून नुकसान झाले आहे. तिन्ही घटनांचे तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पंचनामे करण्यात आले आहेत.
कालकुंद्रीत अतिवृष्टीने मारुती गल्ली येथील कल्लाप्पा भरमू कोले, देव गल्ली येथील नरसू हनमंत पाटील व शिवाजी गल्ली, पाण्याच्या टाकी नजीक (घर नंबर १८७) रघुनाथ बाळू पाटील- साळुगावडे यांची घरे कोसळून घरे व संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या घटनांचे पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केल्याचे समजते.
No comments:
Post a Comment