किटवाडचे प्रा. डॉ. जयंत कार्तिक सेट परीक्षा उत्तीर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2024

किटवाडचे प्रा. डॉ. जयंत कार्तिक सेट परीक्षा उत्तीर्ण

 

प्रा. डॉ. जयंत कार्तिक

चंदगड : सी एल वृत्तसेवा

         प्रा. डॉ. जयंत शिवाजी कार्तिक (रा. किटवाड, ता. चंदगड) हे विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षा सेट इंग्रजी विषयातून उत्तीर्ण झाले. त्यांनी याआधी शिवाजी विद्यापीठ इंग्रजी विभागातून  लोकप्रिय साहित्य विषयातून पीएचडी पदवी संपादन केली आहे. त्यांना पदवी पदव्युत्तर व अभियांत्रिकी शाखांना शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. विविध महाविद्यालयामध्ये त्यांनी काम केले आहे. सध्या ते कोल्हापूर येथील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर येथे इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या यशासाठी त्यांना आई-वडिलांची , मित्र परिवारांची प्रेरणा व संस्था अध्यक्ष रजनीताई मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. एस. जे. फराकटे, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. शितलकुमार गायकवाड, डॉ. सतीश घाटगे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment