बांधकाम कामगार योजना प्रश्नी पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत ढसाळली....! - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2024

बांधकाम कामगार योजना प्रश्नी पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत ढसाळली....!

पाटणे फाटा येथे बांधकाम कामगारांच्या प्रश्नासाठी उपोषण स्थळी बसलेले नारायण वाईंगडे यांची प्रकृती खालावली आहे. सोबत त्यांचे सहकारी

चंदगड : सी एल वृत्तसेवा

   चंदगड तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना शासन स्तरावरून विविध योजनांचे लाभ मिळत असतात. तथापि या योजना परस्पर लाटल्या जातात. याला राजकीय नेते व संबंधित अधिकारी यांच्याकडून खतपाणी मिळत असल्याचा आरोप करत योजना चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे चंदगड विधानसभा मतदारसंघ प्रमुख भाई नारायण रामू वाईंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी पाटणे फाटा येथे उपोषण सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे दरम्यान पाचव्या दिवशी सकाळपासूनच उपोषण करते बाईंगडे यांची तब्येत ढासळली आहे. यावर तहसील कार्यालयाकडून कोणत्या हालचाली होतात याकडे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे लक्ष लागून राहिले आहे.
  राजकीय नेते खऱ्या कामगारांच्या तोंडातील घास काढून घेऊन तो आपल्या मर्जीतील बोगस कामगारांना देतात. यामुळे खरे लाभार्थी वंचित राहतात. असा आरोप करून ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने असे लाभ मंजूर झाले आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निवेदन वाईंगडे यांनी तहसीलदार यांना देऊन दि ९ ऑगस्ट क्रांती दिना पासून पाटणे फाटा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
  या प्रश्नी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी सखोल चौकशी करून बांधकाम कामगारांच्या योजनांवर डल्ला मारणाऱ्या  दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माहितीसाठी आपल्याकडे पाठवावा. असे पत्र दिले आहे. तथापि यामुळे समाधान न झालेल्या वाईंगडे यांनी आपले उपोषण पाचव्या दिवशी सुरूच ठेवले आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बऱ्यापैकी खालावल्याचे दिसते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी असलेल्या खालील योजनांचा लाभ त्यांना मिळत नसल्याचा आरोप आहे.

१) बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवल्या जाव्यात.

१. पहिल्या विवाहासाठीचे अनुदान, २. मध्यान भोजनाच्या बद्दल रेशन मिळावं. ३. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, ४. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ५. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ६. पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना

२) शैक्षणिक योजना-

१. इयत्ता पहिली ते सातवी प्रतिवर्ष २५००/-, २. इयत्ता आठवी ते दहावी प्रतिवर्ष  ५०००/-, ३. इयत्ता दहावी बारावी मध्ये अधिक गुण मिळाल्यास १००००/-, ४. इयत्ता अकरावी व बारावी शिक्षणासाठी प्रति वर्ष १००००/-, ५. पदवी अभ्यास प्रतिवर्ष, मुलांसाठी तसेच कामगाराच्या पती/पत्नी २००००/-, ६. वैद्यकीय  पदवी प्रति वर्ष १००००/-,  ७. अभियांत्रिकी पदवी ६००००/-, ८. शासनमान्य पदवीसाठी, प्रतिवर्षी २००००/-, ९. शासनमान्य पदवीत्तर पदवीसाठी  २५०००/-, १०. दोन अपत्यांना कॉम्प्युटर शिक्षण फ्री


३) आरोग्य योजना

१. नैसर्गिक प्रसूती १५०००/- 

२. शास्त्रीय द्वारा   २००००/-

    ३. गंभीर आजार १०००००/-
    ४. एका मुलीच्या जन्मानंतर १८ वर्षापर्यंत मुदत बंद ठेव १०००००/-
    ५. कायमचे अपंगत्व २०००००/- 75% अपंगत्व
    ६. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
    ७. आरोग्य तपासणी

४) आर्थिक योजना
    १. कामगाराचा मृत्यू झाल्यास ५०००००/-
     २. नैसर्गिक मृत्यू झाल्यास  २०००००/-
     ३. अटल बांधकाम कामगार आवास योजना  २०००००/-
     ४. मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी  १००००/-
     ५. कामगाराचा मृत्यू झाल्यास वारस पतीस / पत्नीस ५ वर्षाकरिता २४०००/-
या सर्व योजनांचा लाभ योग्य पद्धतीने पुरेपूर मला पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
 
उपोषणकर्ते वाईंगडे हे दिव्यांग
     उपोषण कर्ते भाई नारायण वाईंगडे हे दिव्यांग असून मेन्टेनन्स इलेक्ट्रिशन तसेच स्लाइडिंग मिस्त्री आहेत. दिव्यांग असूनही अद्याप कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही. केवळ आपल्या बांधकाम संबंधित( निवासी बांधकाम, व्यावसायिक बांधकाम, औद्योगिक बांधकाम व परिवहन बांधकाम) कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. सरकारने आमचा अंत पाहू नये, मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या मागणीसाठी उपोषण स्थळी बांधकाम कामगार आक्रमक झाले आहेत. 
   गेल्या पाच दिवसांत उपोषण स्थळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, नंदाताई बाबुळकर, प्रा.सुनील शिंत्रे, गोपाळराव पाटील, आदी राजकीय नेत्यांसह वंचित, एल्गार, बांधकाम संबंधित विविध संघटना तसेच विविध क्षेत्रातील सुमारे चारशे पेक्षा अधिक मान्यवरांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment