चंदगड : जास्तीत जास्त नव मतदारांनी आपली नोंदणी करून घ्यावी. - प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2024

चंदगड : जास्तीत जास्त नव मतदारांनी आपली नोंदणी करून घ्यावी. - प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांचे आवाहन

 

चंदगड - ता. ८ : 

        आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा ६ ऑगस्टपासून सुरु होत आहे. यामध्ये नवमतदार नोंदणी, समाजातील विशेष घटकांची मतदार नोंदणी तसेच दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार यादीत आपले नाव तपासून नाव वगळले असल्यास आपली नोंदणी करून घ्यावी. तसेच जास्तीत जास्त नव मतदारांनी आपली नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी 271चंदगड विधानसभा तथा उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले.

       १०, ११, १७ व १८ ऑगस्ट रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष शिबीरामध्ये नोंदणी, दुरुस्ती व वगळणी तसेच नवमतदार नोंदणी, विद्यार्थी, दिव्यांग, महिला, तृतीयपंथी, देह विक्री व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या व्यक्ती या लक्षीत घटकांसाठी विशेष नोंदणी होणार आहे. प्रारूप मतदार यादीची प्रसिध्दी ६ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी मंगळवार ६ ते २० ऑगस्टपर्यंत आहे. ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment