महापुरावरील भीती पत्रकांचे अनावरण करताना मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक |
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
यावर्षी कोल्हापूरसह महाराष्ट्रात महापुराने हाहाकार घातलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा सर्वाधिक फटका बसला. सन २०१९ मधील महापुराच्या आठवणी अजूनही ताज्या असताना यावर्षीही मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले आहे. चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी, घटप्रभा कोल्हापूरच्या पंचगंगा व अन्य नद्यांच्या काठावरील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नदी काठाची भात व ऊस शेती या वर्षी जवळपास संपुष्टात आली आहे. बाजारपेठा व वाहतुकीवर या महापुराचा मोठा परिणाम झाला आहे. या महापुराची दाहकता दर्शवणाऱ्या भीत्तीचित्रांचे अनावरण जनता विद्यालयात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध वर्तमानपत्रातील महापुरावरील कात्रणे जमा करून महापुराची दाहकता दर्शवणारी भित्तीचित्रे तयार केली. या महापुरावरील बातम्यांचा व चित्रांचा संग्रह करण्यासाठी विद्यार्थ्यांना अगोदरच कल्पना देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी ही सर्व भीत्तीचित्रे मार्गदर्शक शिक्षकांच्या साह्याने तयार करून सर्व विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुली केली. विद्यार्थ्यांमधील संवेदनशीलता या भित्तीचित्रांनी जागी केली. आपत्कालीन परिस्थितीशी लढण्याची प्रेरणा या भित्तीचित्रांनी मिळू शकेल.
या भीत्तीचित्रांचे अनावरण शाळेचे मुख्याध्यापक पी एन यळ्ळूरकर यांनी केले. सांस्कृतिक व मराठी विभाग प्रमुख बी एन पाटील यांच्या संकल्पनेतून ही भित्तीचित्रे तयार करण्यात आली. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक एस ए पाटील, ज्येष्ठ शिक्षक ए के नाईक आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment