चंदगड : सी एल वृत्तसेवा
राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद झाला आहे. राजेंद्र नारायण पाटील (रा. राजगोळी बुद्रुक) असे संशयित आरोपीचे नाव असून ही घटना काल दि ३० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. याबाबत पीडित महिलेने स्वतः चंदगड पोलीस ठाणे येथे हजर राहून फिर्याद दिली आहे.
याबाबत कोवाड व चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, यातील संशयित आरोपी हा फिर्यादी यांच्या चुलत नणंदेचा पती असून गेल्या दीड वर्षापासून फिर्यादी आणि आरोपी हे मिळून शेती करत होते. पण आरोपी यांची वर्तणूक चांगली दिसत नसल्यामुळे पिडीत महिलेने त्यांचे सोबत जून २०२४ पासून एकत्र शेती करणे बंद केले होते. तरी देखील आरोपी राजेंद्र हा फिर्यादी यांच्या सतत मार्गावर असायचा. काल रात्री साडेनऊच्या सुमारास ही महिला आपल्या घराच्या मागे जाऊन परत येत असताना आरोपीने अचानक पाठीमागून येऊन उजव्या हाताला धरून ओढून त्यांचा विनयभंग केला. पीडित महिलेने चंदगड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीवर भारतीय दंड संहिता २०२४ चे कलम ७४, ७८ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशाने हवालदार जमीर मकानदार हे अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment