कडगाव (ता. भुदरगड) येथील राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडमी कडगांव येथे विविध क्षेत्रातील यशस्वीतांचा गौरव करताना मान्यवर
गारगोटी : सी. एल. वृत्तसेवा
१ सप्टेंबर २०२४ रोजी मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापनदिन शहाजीराजे फाऊंडेशन कडगाव, ता भुदरगड संचलीत राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडमी कडगांव येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व निवड झालेल्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. गेली ३ दशके कडगावसारख्या व्यापारी केंद्र असलेल्या समृद्ध गावात एकच सार्वजनिक गणेशोत्सव पारदर्शीपणी चालविणाऱ्या तसेच मधुमेह मुक्ती व व्यसनमुक्ती कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या राजेंद्र पांडुरंग देसाई (कडगाव), गावची सुकन्या कु. सायली संताजी देसाई हिची मंत्रालय कक्ष अधीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तिच्या आईवडीलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शहाजीराजे फाउंडेशनचे अध्यक्ष शहाजी देसाई यांनी मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आदी ३३ कक्षांच्या वतीने केलेल्या जागृतीमुळेच जिजाऊ, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे कार्य व विचार घराघरा पोहोचले असे सांगितले.
१ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे इंजिनीअर ॲड पुरुषोत्तम खेडेकर यांनी महाराष्ट्रातील विविध अधिकारी यांना बरोबर घेऊन मराठा सेवा संघाची स्थापना केली. गेल्या ३४ वर्षात हजारो लेखक, वक्ते, शाहिर निर्माण करून त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक व जातीय सलोखा निर्माण केला आहे. बूट पॉलिश ते तेल मॉलिश करा हा संदेश समाजात पेरल्यामुळे श्रमप्रतिष्ठा निर्माण झाली आहे. ३० वर्षापूर्वी मराठा आरक्षण हक्कlचा लढा उभा केल्याने ती एक लोक चाळवळ निर्माण झाली आहे. आजच्या महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याचे खरे निर्माते ॲड खेडेकर हेच आहेत.
यावेळी श्री शहाजीराजे फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य व अरुण विकास सेवा संस्था कडगावचे चेअरमन मिलिंद देसाई, युवा नेते काशिनाथ देसाई, उद्योजक सचिन जाधव, अंकुश पाटील, भीमराव देसाई, सुधाकर देसाई, सुधा देसाई, अमृत कांबळे, भाजप चे युवा कार्यकर्ते भिकाजी कोगनुळकर, राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडेमीच्या अध्यक्षा वंदना देसाई, तुळशीदास यादव आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे स्वागत दीपाली देसाई यांनी केले. प्रस्ताविक किशोर कारिवडेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्राजक्ता देसाई यांनी तर शहाजीराजे फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष सुधाकर देसाई यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment