कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, अशा भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र तैनात असलेल्या जवानांसाठी केंद्रशाळा कुमार विद्यामंदिर मांडेंदुर्ग, ता चंदगड शाळेच्या वतीने राख्या पाठवण्यात आल्या. सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थिनींनी स्वकल्पकतेने या राख्या बनवल्या होत्या.
मांडेदुर्ग शाळेतील विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या आर्मी केंद्र बेळगाव येथे पाठवण्यात आल्या. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थिनी. |
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एम.डी नाईक, अध्यापिका कविता पाटील, सुभद्रा पाटील, सुधा पाटील, राम कांबळे, विश्वनाथ पाटील, भरमू कांबळे यांचे मार्गदर्शन व शाळा व्यवस्थापन कमिटीचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment