चंदगड: सी. एल. वृत्तसेवा
आपल्या हिंदू संस्कृतीत सण उत्सवांना अनन्य साधारण महत्व आहे. घरोघरी, मंदिरात धार्मिक ग्रंथांचे वाचन केले जाते.वाचनाने मने सुसंस्कारीत होतात. हाच धागा पकडून वाचन चळवळीसाठी येथील दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये मुख्याध्यापक एन. डी. देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणमासाच्या निमित्ताने साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाचे पारायण सुरु केले आहे.
समाजाला आज श्यामच्या आईच्या संस्काराची गरज आहे. म्हणून या पुस्तकाचे वाचन घरोघरी झाले पाहिजे"असे प्रतिपादन मुख्याध्यापक एन.डी. देवळे यांनी केले. ग्रंथपाल शरद हदगल यांनी मुलांना 'श्यामची आई ' पुस्तकाच्या ५० प्रति उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थी रोज सकाळी शाळा भरण्यापूर्वी एक तास अगोदर पुस्तकाचे वाचन करतात. आवडलेल्या घटनां वहीत नोंद करून ठेवतात.
या उपक्रमाविषयी उपक्रमशिल शिक्षक संजय साबळे म्हणाले .की, " मुलांच्यात वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी असे उपक्रम उपयोगी पडतात.वाचनाने मस्तक सुधारते. सुधारलेले मस्तक कोणासमोरही झुकत नाही." यावेळी कार्यक्रमाला ज्येष्ठ अध्यापक टी. एस. चांदेकर, एस. जी. साबळे, व्ही. के. गावडे, एस. व्ही. हदगल, डी. जी. पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment