चंदगड : सी एल वृत्तसेवा
'चंदगड येथील पंचायत समिती आवारातील शिक्षण विभागाशी संबंधित 'गट साधन केंद्र' (बीआरसी) व अंगणवाडी संबंधित 'एकात्मिक बाल विकास केंद्रा'च्या इमारती दलदल व समस्यांच्या विळख्यात...!' अशा आशयाचे वृत्त चंदगड तालुक्याचे मुखपत्र असलेल्या सी एल न्यूज तथा चंदगड लाईव्ह न्युज मधून दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत संबंधित विभागांकडून दोन्ही इमारतींच्या आजूबाजूला वाढलेला झाडोरा, घाणीचे साम्राज्य जेसीबी यंत्राद्वारे स्वच्छतेचे काम आज दि. ५ ऑगस्ट रोजी सुरू केले. या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता
बीआरसी व एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात अनुक्रमे शिक्षण क्षेत्राशी संबंधित शिक्षक, पालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व नागरिकांची कामानिमित्त वर्दळ असते. तालुक्यातील मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील व त्यांचे सहकारी कामानिमित्त चार दिवसांपूर्वी या ठिकाणी गेले असता त्यांना दोन्ही कार्यालयांच्या इमारती दलदल, वाढलेला झाडोरा, चिखल, दुर्गंधी व घाणीच्या विळख्यात सापडलेल्या दिसल्या. याबाबत संताप व्यक्त करत दोन्ही इमारतींमध्ये जाण्यासाठी असलेला मार्ग व आजूबाजूला बेसुमार वाढलेली झाडे-झुडपे, फोफावलेले रान, चिखल व घाणीचे साम्राज्य स्वच्छ करून येजा करण्याच्या मार्गावर पेविंग ब्लॉक बसवून येत्या १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत काम पूर्ण न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा विवेक पाटील, तालुकाध्यक्ष राज सुभेदार, सरचिटणीस तुकाराम पाटील व कार्यकर्त्यांनी दिला होता. चंदगड लाईव्ह न्युज चॅनेल न ही बातमी लावून प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल विवेक पाटील यांच्या सह सर्वांनी सी एल न्यूज चे आभार व्यक्त करून सुरू झालेल्या कामा याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment