विंझणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अनिरुद्ध रेडेकर यांच्याकडून मदतीचा हात - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2024

विंझणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अनिरुद्ध रेडेकर यांच्याकडून मदतीचा हात

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        विंझणे (ता. चंदगड) गावातील शेतकरी श्री संभाजी जानबा पवार यांना अनिरुद्ध रेडेकर यांच्या वतीने मदत करण्यात आली. संभाजी पवार यांची बकरी चारायला गेली असता विषबाधा होवुन ३ बकरी मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यांना मदत म्हणुन अनिरुद्ध रेडेकर यांनी एक मोठी शेळी तसेच दोन लहान पिल्ले शेतकऱ्याला मदत म्हणून दिली. शेतकरी जगला पाहिजे या भावनेतून श्री. रेडेकर यांनी ही मदत केली. 

       यावेळी ग्रामपंचायत विंझण्याचे सरपंच तानाजी पवार, कृष्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप चौरे, तसेच माजी उपसरपंच संजय नाईक, विंझणे पंचायतीचे सर्व सदस्य, तसेच गावातील शेतकरी वर्ग,युवा पिढी तसेच शिवसेना पदाधिकारी सुशांत नौकुडकर, समाजसेवक सुभाष होनगेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment