शिनोळी औद्योगिक वसाहतीत बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना संघटनेचे पदाधिकारी
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
उद्योग नगरी शिनोळी, ता चंदगड येथे बांधकाम संबंधित कामगारांची बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी कामगारांना लाभाच्या योजना व विविध विषयांवर माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी संदीप पाटील होते. शेकाप बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (महाराष्ट्र राज्य) चंदगड विधानसभा मतदारसंघ प्रमुख भाई नारायण रामू वाईंगडे यांनी स्वागत केले. सुरज सुतार (सांबरे) यांनी प्रास्ताविक केले.
भाई वाईंगडे यांनी सर्व खऱ्या बांधकाम कामगारांना एकत्र यावे. सर्व शासकीय योजना कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कामगारांच्या योजनांचा लाभ काही लोक बोगस कामगार नोंद करून त्यांना देत आहेत. याला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन दलाल, एजंट आणि त्यांना सहकार्य करणारे राजकीय लोक यांच्या घरी, ऑफिसवर मोर्चे घेऊन जाण्यासाठी सज्ज राहावे. बांधकाम कामगारांना ५६ व्या वर्षी पेन्शन मिळावी. त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालये व सर्व शासकीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष असावेत, बांधकाम कामगार असल्याची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार संघटनेला मिळावा आदी मागण्यांसाठी ९ सप्टेंबर २०२४ रोजी पाटणे फाटा (ता चंदगड) येथे होणाऱ्या कामगार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. शेतकरी कामगार परिवार संघाच्या माध्यमातून, तोरणा पतसंस्थेची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीस सातेरी मेलगे, गणपत मेलगे, रमेश पाटील, परशराम आपटेकर, रामचंद्र पाटील, दिनकर गवंडी, प्रवीण मेलगे, विठ्ठल पाटील, मोहन बेनके, परशराम पाटील, विलास नेवगिरी आदींसह विविध गावातून शेकडो कामगार उपस्थित होते. मोनाप्पा बाळेकुंद्री यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment