कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील श्री देव वैजनाथ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. स्थापनेपासून सलग आठव्या वर्षी सभासदांना १४ टक्के लाभांश देणारी जिल्ह्यातील अग्रेसर संस्था ठरली आहे.
कार्वे येथील मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन विलास विठोबा पाटील होते. प्रास्ताविक व्हा. चेअरमन अर्जुन चाळुचे यांनी केले. यावेळी अहवाल सालात झालेल्या नफ्यातून सभासदांना १४% डिव्हीडंड व दिवाळी भेटवस्तू देणे, मध्यम मुदतीचे ५ लाख रुपये पर्यंतचे कर्ज साडेनऊ टक्के व्याज दराने वाटप करणे, नवीन नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना आकस्मिक रु १ लाख पर्यंत कर्ज देणे, दिवाळी कर्ज रु १ लाख ९ टक्के व्याज दराने देणे, डीसीपीएस मयत सभासद शिक्षकांच्या वारसांना तातडीने ५० हजार रुपये देणे, तंत्रस्नेही शिक्षकांना लॅपटॉप खरेदीसाठी गणेश चतुर्थी पासून ९ टक्के व्याज दराने रु १ लाख कर्ज देणे, महिला सभासदांना व्याजदरात सवलत, मयत सभासदांना घेतलेल्या कर्जातील ३० टक्के कर्ज माफ करणे आदी ठराव संमत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी संस्थेच्या १९ सप्टेंबर २०१६ या स्थापना दिनांकापासूनचा लेखाजोखा मांडला. यावेळी झालेल्या चर्चेत सदानंद पाटील, भरमू तारीहाळकर, अनंत मोटर, शामराव पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकारणी व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन जी एस पाटील यांनी केले. भरमाणा मुरकुटे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment