लाचेची मागणी झाल्यास फक्त एक कॉल करा.- एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांचे तक्रारदारांना आवाहन कोल्हापूरात घेतला पद्भार - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2024

लाचेची मागणी झाल्यास फक्त एक कॉल करा.- एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांचे तक्रारदारांना आवाहन कोल्हापूरात घेतला पद्भार

वैष्णवी पाटील

कोल्हापूर :- प्रतिनिधी

     कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयात कामानिमित्ताने गेल्यानंतर कोणी लाचेची मागणी करून तुमचे काम थांबवत असेल. विहीत कालावधीत तुमचे काम केले नाही, तर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात एक कॉल करावा. तुमची तक्रार जाग्यावर घेऊन सापळा रचून संबंधितास अटक केली जाईल. तुमचे रखडलेले कामही मार्गी लावले जाईल, असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले. मंगळवारी त्यांनी कोल्हापूर कार्यालयातील पद्मार स्विकारला.
     मुळच्या सांगली जिल्ह्यातील कांदे (ता. शिराळा) येथील रहिवाशी असलेल्या वैष्णवी पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक असताना जुना राजवाडा पोलीस

आपल्या सेवेला प्रारंभ केला. वाहतूक नियंत्रण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, त्यानंतर सांगली येथेही त्यांनी सेवा बजावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर कार्यालयातील उपअधीक्षक सरदार नाळे यांनी बदली झाल्यामुळे वैष्णवी पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूरचा पद्भार स्विकारला.
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी काम केल्यामुळे त्यांचा जिल्ह्यांचा संपूर्ण अभ्यास आहे. महसूल विभागासह इतर शासकीय कार्यालयात काही लोक लाचेची मागणी करून काम अडवून ठेवतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची ठाण्यातून पिळवणूक होत असते. कुठे तक्रार करायची, तक्रार केली तर न्याय मिळेल का? असे अनेक प्रश्न नागरिकांना सतावत असतात. मात्र यापुढे एसीबीच्या कार्यालयामार्फत सर्वसामान्य लोकांमध्ये विश्वास आणि जनजागृती निर्माण केली जाईल.
   आठवडी बाजार प्रबोधन करण्याबरोबरच प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रथमदर्शनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री नंबर, मोबाईल नंबर असलेले फलक लावले जातील. तक्रारदारांनी एसीबीच्या कार्यालयात येऊनच तक्रार द्यावी असे नाही, केवळ फोन केला तरी ते जिथे असतील तेथे अथवा घरात जाऊनही आम्ही त्यांची तक्रार नोंदवून घेऊ शकतो. जनजागृती करून तक्रारदारांनी तक्रारी घेऊन आमच्यापर्यंत यावे असे वातावरण निर्माण केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment